महापालिकेतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

दि. २७/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी केंद्रीय कृषी मंत्री दिवंगत डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, देवेंद्र मोरे, कर्मचारी महासंघाचे बालाजी अयंग्गार तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

डॉ.भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म अमरावती येथील पापळ गावी झाला. त्यांनी शाळेचे शिक्षण पापळ येथे व नंतर अमरावती येथे पूर्ण केले. त्यांनी उच्च शिक्षण हे एडनबर्ग व ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. अमरावती येथे परत येवून त्यांनी कायद्याच्या शिक्षणाची तयारी सुरु केली. देशमुख यांची प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते केंद्रीय शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. त्यांनी शेती विषयक अनेक सुधारणा केल्या.गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची तसेच शिक्षण संस्थांची स्थापना देखील त्यांनी केली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *