वाचन संकृती वाढीसाठी “पुस्तक आपल्या दारी” उपक्रमाचे उदघाटन

दि. ०२/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी :  पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वतीने  सुनिधी पब्लिशर्स यांच्या सहकार्याने “पुस्तक आपल्या दारी”नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या अभिनव उपक्रमाचे उदघाटन पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीच्या आवारात विजय भिसे व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले . वाचन आणि लेखन संस्कृतीस  प्रोत्साहन मिळावे, इंटरनेट व मोबाईल  पासून दूर जाऊन पुस्तके हातात घेऊन वाचली जावीत. या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन चे अध्यक्ष विजय भिसे यांनी सांगितले .

हा  उपक्रम शहरातील प्रत्येक सोसायटीच्या आवारात जाऊन नागरीकांना वाचनास प्रवृत्त करण्याचा हा संकल्प आहे . शहरातील प्रत्येक सोसायटीत जावून अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन मांडले जाणार आहे.एका सोसायटीमधील वाचकांसाठी दोन दिवस पुस्तके उपलब्ध होतील. त्याच बरोबर लेखक देखील वाचकांसोबत संवाद साधणार आहे.

याप्रसंगी लेखिका अनिता भिसे, पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन चे कार्याध्यक्ष सतीश इंगळे ,सचिव सुनील थोरात ,क्रीडाप्रेमी शशी काटे ,सोसायटीचे चेअरमन विनोद सुर्वे ,शिल्पा पिसाळ ,अन्य पदाधिकारी ,लेखिका अनिता भिसे ,रामेश्वर राऊत उपस्थित होते

सुनिधी पब्लिशर्स चे अविनाश काळे यांनी स्वागत व आभार सर्वांचे  मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *