बेल्ह्याच्या पूर्वी लाहोटी हिचा NEET परीक्षेत देशात ३०८७ वा क्रमांक

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२१ नोव्हेंबर २०२१

बेल्हे


मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पूर्वी जितेंद्र लाहोटी हीने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून तिचा ऑल इंडिया रँक ३०८० आला आहे. बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची १२ वी ची विद्यार्थिनी पूर्वी लाहोटी हिने १२ सीबीएसई बोर्ड परीक्षेत ९४.४ गुण मिळवले तसेच नीट परीक्षेत ६५६ गुण मिळून ऑल इंडिया रँक ३०८७ मिळवला आहे.त्याचबरोबर एमएच सीईटीमध्ये ३९ व रँक आहे. तर आयसीएआर परीक्षेत मध्ये ४० वा रँक तिने मिळवला आहे. तसेच तिला एन.आय.एस.इ.आर ऑल इंडिया रँक १३० मिळाला आहे. आय.आय.एस.इ.आर मध्ये देखील १५१ व रँक मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या घवघवीत यशाची परिसरात चर्चा असून तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे,सीईओ शैलेश ढवळे, प्राचार्य विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे,उपप्राचार्य के.पी.सिंग तसेच सर्व संचालक मंडळांनी पूर्वी चे अभिनंदन केले.तसेच १२ वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *