मराठा महासंघातर्फे मंचर येथे जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

दि. १२/०१/२०२३

मंचर

 

मंचर : अखिल भारतीय मराठा महासंघ आंबेगाव तालुका आयोजित माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथे केले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध क्षेत्रातील नामवंत तसेच उत्कृष्ठ कामगिरी करणा-या दोनशे महिलांचा सत्कार मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला होता.

गावागावात महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत त्यासाठी मराठा महासंघाच्या माध्यमातून कै. आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन आर्थिक सहाय्य मिळेल असे जिल्हाध्यक्ष श्री. अंकुशराव लांडे यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व तालुकाध्यक्ष सौ. मनिषा गावडे यांच्या जिजाऊ वंदनेने झाली.

शिवव्याख्यात्या अर्चनाताई करंडे यांचे जिजाऊविषयी व्याख्यान झाले.यावेळी आंबेगाव तालुका तहसिलदार रमा जोशी व आळेफाटा पोलिस स्टेशनच्या एपीआय रागिणी कराळे यांचे मार्गदर्शन झाले. व मंचर पोलिस स्टेशनच्या पीएसआय रूपाली पवार व मंचर पोलिस स्टेशनच्या सर्व महिला अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी नायब तहसिलदार लतादेवी वाजे, सर्व महिला पोलिस कर्मचारी, वकिल डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला सफाई कामगार, महिला सरपंच, ग्रा.पं. सदस्या, पं.स. सदस्या, नर्स व इतर क्षेत्रातील असे एकुण दोनशे महिलांचा सत्कार जिजाऊचा फोटो व आंब्याचे झाड आणि गुलाबाचे फूल देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मराठा महासंघाच्या वतीने सरचिटणीस सौ. संगिता शेवाळे, उपाध्यक्षा मालती थोरात, तालुकाध्यक्षा मनिषा गावडे, कार्याध्यक्षा संगिता बाणखेले, सरचिटणीस अरुणा टेके, चिटणीस रोहिणी अजाब, जुन्नर तालुकाध्यक्ष शोभा पाचपुते, उपाध्यक्षा वर्षा गाडगे, खेड तालुका उपाध्यक्षा निता रोडे, सुमन बोंबे, स्वप्ना काळे, तालुकाध्यक्ष सोमनाथ हुले उपाध्यक्ष सुरेश निघोट, मार्गदर्शक वसंत बाणखेले उपाध्यक्ष गणेश खानदेशे जिल्हाउपाध्यक्ष विशाल निलुका संपर्कप्रमुख बाळासाहेब गाणे, नवनाथ शिंदे, दत्ता खिलारी, अल्लु इनामदार, सुभाष लांडे, भास्कर पाबळे, राजु इनामदार, अरुण थोरात. जे. के. थोरात, भिवाजी आढळराव व अंकुश शेवाळे आदी उपस्थित होते.

यावेळी सूत्रसंचालन योगेश हुले यांनी केले व आभार मराठा महासंघाचे मार्गदर्शक वसंतराव बाणखेले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *