दापोली न्यायालयाकडून अनिल परब यांना जामीन मंजूर

दि. १२/०१/२०२३

मुंबई

 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब आणि उद्योजक सदानंद कदम आज गुरुवारी (ता. १२) दापोली न्यायालयासमोर हजर झाले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर सीआरझेडच्या नियमाचे उल्लंघन करून अवैध बांधकाम करण्याचा आरोप केला होता.

तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड व एनडिझेड म्हणजे ना विकास क्षेत्र परिसरात साई रिसॉर्ट उभारल्याबाबत अनिल परब आणि सदानंद कदम यांना दापोली न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाने या संदर्भातील सुनावणीसाठी २३ फेब्रुवारी २०२३ ही तारीख दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *