राजुरीच्या संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ईद निमित्त कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना खीर चे वाटप…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
15/05/2021

राजुरीच्या संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ईद निमित्त कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना खीर चे वाटप

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

रमजान ईद चे औचित्य साधून राजुरी ग्रामपंचायत सदस्य शाकीर भाई चौगुले, संकल्प चे अध्यक्ष कलीम पटेल , उपाध्यक्ष जीलानी पटेल , मुबीन पटेल व इतर संकल्प बहुद्देशी युवा संस्थेच्या सेवकांनी ख्वाजा गरीब नवाज कोव्हीड केअर सेंटर मधील रुग्णांना शिरखुर्मा (खीर) चे वाटप करून जुन्नर तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी संकल्पच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे.
संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था या पुणे जिल्ह्यातील अग्रेसर संस्थेच्या वतीने संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख व प्रा.मेहबूब काझी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक , सामाजिक व क्रीडा या क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. संकल्प कडून गेल्या ४ वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील राजुरी व लगतच्या गावातील वयोवृद्ध व निराधार यांना दोन वेळचे जेवण लोकवर्गणीतून मोफत दिले जात असून या मुळे परिसरातील गरजूंना मोठा आधार मिळाला आहे. या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा केंद्र,उर्दू अंगणवाडी, पुणे जिल्हा स्तरावरील पालकमंत्री क्रिकेट चषक असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवित असून या मुळे तालुक्यातील नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. या सर्व उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सन २०१९ साली राज्यस्तरीय पुरस्कार देऊन संस्थेचा गौरव केला आहे.
राजुरी व परिसरातील इतर गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून याची दखल घेऊन स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून, दारूल उलूम हिलालिया गरीब नवाज या संस्थेचे मुबारक भाई तांबोळी तसेच प्रा.मेहबूब काझी सर, हाजी गुलामनबी शेख व शाकिर भाई चौगुले यांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायत राजुरी यांच्या सहकार्याने राजुरी येथे ख्वाजा गरीब नवाज कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.सदर कोव्हीड केअर सेंटर मधील रुग्णांचे उपचार डॉ. स्वप्नील कोटकर, डॉ.संदीप काकडे व डॉ. शिंदे हे अहोरात्र कष्ट घेऊन करीत आहेत.
संकल्प संस्थेच्या वतीने या कोव्हीड सेंटर मधील रुग्णांसाठी लोकवर्गणीतून ७० हजार रुपयांच्या औषधांची मदत देण्यात आली व दाखल होणाऱ्या रुग्णांना अन्नपूर्णा केंद्राच्या वतीने पौष्टिक असे शाकाहारी जेवण ही दिले जात आहे.संकल्प चे सर्व पदाधिकारी व संकल्प सेवक हे रात्रंदिवस रुग्णांची काळजी घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *