दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

दि. ११/०१/२०२३
तळेगाव दाभाडे


तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे जवळ असलेल्या श्री क्षेत्र घोरावडेश्वर डोंगरावर असलेल्या श्री शंकराच्या मंदिराजवळील दरीत कोसळून सदर 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मण जटप्पा पुजारी (वय 25 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, म्हाडा कॉलनी) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडेजवळ असेलल्या घोरावडेश्वर मंदिर येथे दररोज अनेक पर्यटक भेट देत असतात. तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला लक्ष्मण पुजारी घोरावडेश्वर डोंगरावर गेला असता शंकर मंदिराजवळील दीडशे फूट खोल दरीत कोसळला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्याचा मृतदेह शोधण्यास मदत केली. यावेळी तळेगाव दाभाडे पोलिस एपीआय राहुल साळी आणि अन्य सहकारी उपस्थित होते. महेश मसने, सागर कुंभार, राजेंद्र कडु, अमोल सुतार, हर्ष तोंडे, अशोक उंबरे, हर्षल चौधरी, रतन सिंग, कमल परदेशी, अनिल आंद्रे, भास्कर माळी, सत्यम सांवत, विकी दौंडकर, सुनिल गायकवाड आणि निलेश संपतराव गराडे यांनी मृतदेह शोधण्यात आणि दरीतून वर काढण्यात मदत केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *