श्री कुलस्वामी को-ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा व्यवहार पारदर्शक – माजी अध्यक्ष शरद सोनवणे

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२५ जानेवारी २०२२

नारायणगाव


कुलस्वामी संस्थेच्या आर्थिक व्यवस्थेच्या चौकशी बाबत शरद सोनवणे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा

संपूर्ण महाराष्ट्र तथा मुंबई, नवी मुंबई, नगर, सातारा, पुणे जिल्ह्यात मोठा शाखा विस्तार असलेल्या श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून संस्थेचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार ठाणे उपजिल्हा निबंधक कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर संस्थेची सहकार आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी याबाबतची बातमी आज काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली.

या अनुषंगाने कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक तथा माजी आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर येथील कुलस्वामी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन संस्था चांगला आणि पारदर्शक कारभार करत असून यामागे केवळ राजकारण व खोडसाळपणा असल्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.

कुलस्वामी क्रेडिट सोसायटी ही संस्था कशा पद्धतीने आर्थिक फायद्या मध्ये आहे याविषयी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आज सविस्तर माहिती दिली.

संस्थेकडे ७८१ कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेने ५८१ रुपये कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे.

याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय चव्हाण, संतोष घोटणे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अरुण काशीद, भागेश्वर डेरे, नवनाथ पवार तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा मांडताना माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, संस्थेचे एकूण एक लाखांपेक्षा जास्त सभासद असून स्वनिधी ८७ कोटी रूपये एवढा आहे. संस्थेकडे ७८१ कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेने ५८१ रुपये कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. तर संस्थेची गुंतवणूक २४५ कोटी रुपये आहे. संस्थेच्या बँकेतील गुंतवणुकीच्या वैधानिक तरलतेच्या व्यतिरिक्त ५० कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक आहे. संस्थेने एनपीए व इतर वैधानिक १०० % तरतुदी केलेल्या आहेत. संस्थेच्या स्वमालकीच्या १७ जागा असून संस्थेचा १ हजार ३६२ कोटी रुपये संमिश्र व्यवसाय आहे.

यामुळे विरोधक केवळ निवडणूक तोंडावर असल्याने निराधार आरोप करीत आहेत. सभासदांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा विचार करून विरोधकांनी रचलेल्या कुटिल डावाला बळी पडू नये. असे आवाहन यावेळी शरद सोनवणे यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *