राज्याचे गृहमंत्री मा. ना दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्यामुळे आंबेगाव तालुक्यातील दलित वस्त्यांचा कायापालट झाला आहे. असे गौरोवोदगार युगप्रवर्तक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी व्यक्त केले…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
          आंबेगाव तालुक्यातील चास य गावी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या 20 टक्के निधीतून  बौद्ध वस्तीच्या अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता 7 लक्ष व मातंग वस्ती अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता 6 लक्ष या नवीन मंजूर कामांचे भूमिपूजन युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गौतमराव खरात यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.

आंबेगाव तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम  आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते व  राज्याचे गृहमंत्री मा वळसे पाटील यांच्या मुळे झाले आहे साहेब हे तालुक्यातील प्रत्येक समाजाची गरज ओळखून विकास कामांना निधी उपलब्ध करून देत असून तालुक्यातील वाडी वस्ती ला जोडणारे रस्ते,शाळा,आरोग्याच्या सुविधा  दलित वस्त्या मधील रस्ते समाजमंदिर अंतर्गत रस्ते गटारे हायमास्ट दिवे ग्रंथालय ह्या सर्व सुविधा आज आंबेगाव तालुक्याच्या प्रत्येक दलीतवस्तीत केवळ वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या  आहेत  सर्व मंजूर कामे  दर्जेदार झली पाहिजे  यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व वस्तीतील तरुणांनानी जातीने लक्ष घालून काम दर्जेदार करून घ्यावे असे  अहवान खरात यांनी केले


          यावेळी शरद  बँकेचे मा संचालक  खंडू बारवे सर ,पंचायत समितीचे मा सदस्य खंडू पारधी माजी उपसरपंच रोहिदास  बारवे  ग्रामविकास अधिकारी जयवंत मेंगडे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव समितीचे अध्यक्ष अमित रोकडे युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल अंकुश  सामाजिक कार्यकर्ते साहेबराव रोकडे ग्रामपंचायत सदस्य संतोष रोकडे डॉ सचिन बारवे  सुभाष रोकडे सुनील रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते