कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून

दि. १०/०१/२०२३
लोणावळा


लोणावळा : कामशेत येथे रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून डोक्यात कोयत्याने वार करून पतीने पत्नीचा खून केला.

मयुरी दशरथ शिंदे (वय 38, रा. कामशेत, रॉयल चायनीजच्या मागे, ता. मावळ) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती दशरथ विठ्ठल शिंदे (वय 43, रा. कामशेत, रॉयल चायनीजच्या मागे, ता. मावळ) याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने दि. 13 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत ता. मावळ येथे आरोपी दशरथ शिंदे याने रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कामशेत शहरातील आपल्या राहत्या घरी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून आपल्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या घटनेत मयुरी शिंदे यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनास्थळी लोणावळा विभाग सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *