ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव सुरू करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे आंदोलन

दि. १०/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव गेले एक वर्ष बंद असून त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नाही. हा जलतरण तलाव तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी करत  चिंचवड महापालिका प्रशासनाच्या विरोधात वडमुखवाडी, चऱ्होली येथे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

हा जलतरण तलाव गेले वर्षभर बंद आहे. अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे तो सुरू केला जात नाही. त्यामुळे जलतरण खेळाडू आणि विरंगुळा म्हणून जलतरण करू इच्छिणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आम आदमी पक्षाकडे आल्या होत्या. या समस्ये कडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचे भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष मंगेश आंबेकर, इमरान खान आणि दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

महिलाध्यक्षा स्मिता पवार, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे यांनी यावेळी महापालिका प्रशासनावर सडकून टीका केली. पंधरा दिवसात हा जलतरणतलाव सुरू झाला नाही तर तर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या वेळी वाजिद शेख, ब्रह्मानंद जाधव, स्वप्निल जेवळे, नाझनीन शेख, कदम ताई, प्रसाद ताठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *