उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते शिरूर न. पा. च्या नूतन इमारतीचे शुक्रवारी उद्घाटन

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
३० सप्टेंबर २०२१

शिरूर 

Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the new building of Shirur Municipal Corporation on Friday

शिरूर नगर परिषदेच्या नूतन व भव्य दिव्य इमारतीचे उद्घाटन, शुक्रवार दि. १ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. होणार आहे. सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या भव्यदिव्य इमारतीमुळे, शिरूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

या इमारतीचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.

परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, हा कार्यक्रम प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावली नुसार पार पडणार असल्याचे, शिरूर नगर परिषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ रसिकलाल धारिवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तसेच कोरोना निर्बंधामुळे समारंभ स्थळी फक्त निमंत्रीतांनाच पास द्वारे प्रवेश असणार आहे. समारंभ प्रवेशासाठी मास्क लावणे अनिवार्य आहे. सुरक्षित अंतर राखण्याची सर्वांची जबाबदारी राहील.

तसेच लोकांनी गर्दी न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *