कोरोना काळातही संस्कार प्रतिष्ठानचा वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा, गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप, तर गरज असलेल्यांची केली कोरोना चाचणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड -दि १० मे २०२१ संस्कार प्रतिष्ठानच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध उपक्रम राबवत साजरा केला वर्धापनदिन .
मंडळाच्या वतीने वाल्हेकरवाडी येथील मायबोली गो शाळेत जाऊन तेथील गाई ना चारा दान केले. नंतर बिजलीनगर चिंचवड , प्रेमलोक पार्क, शिवनगरी, चिंचवडेनगर परिसरातील ५३० नागरिकांचे डॉक्टरांच्या पथकाद्वारे थर्मल स्कॕनिंग करुन अॉक्सीमीटरने अॉक्सिजन तपासणी केली. ज्यांना साधारण सर्दी खोकला होता त्यांना औषधांचे वाटप केले. ज्यांची अॉक्सिजन लेवल कमी जास्त होती त्यांना घाबरुन न जाता त्यांचे मनोधैर्य वाढवले व करोनाची चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. या कामात डॉ मृणाल फोंडेकर, डॉ.निरज पाटील, डॉ.किरण जोशी यांनी मदत केली. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत १००० नागरिकांची तपासणी केली .


१८ वर्षा च्या पुढील वयोगटातील नागरिकांना आॕनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावयाचे याची माहिती व प्रशिक्षण दिले.
बिजलीनगर , शिवनगरी , चिंचवडेनगर, थेरगाव परिसरातील धुणेभांडी, व घरकाम करणाऱ्या २५ महिलांना १५ दिवस पुरेल एवढे धान्याचे किट वाटप केले. यामध्ये ५ कि.गहु,१ डाळ,१ लि.तेल,१ कि मीठ,१०० ग्रॕम मिरची पावडर,जिरी,मोहरी,हळद,१ किलो कांदे,१कि बटाटे असे किट करुन वाटप करण्यात आले.


४.सायंकाळी ५ ते ९ या वेळेत चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाफेकर चौकात नाकाबंदीला मदत करुन नाकाबंदी सोबत असणाऱ्या गरजू नागरिकांना मास्कचे वाटप केले. हे सर्व उपक्रम पी पी ई किटचा वापर करुन सुरक्षित पार पाडला. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी दिली.