पुणे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळा बंद होणार?

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळा बंद करण्याची कारवाई करण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या 13 शाळा अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे. या शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले  असल्याचे समजते. दरम्यान या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जवळच्या अन्य शाळांमध्ये त्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे  कळते.

जिल्ह्यातील अनधिकृत शाळा पुढीलप्रमाणे आहेत. ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (आंबेगाव बुद्रूक ता. हवेली), पुणे इंटरनॅशनल स्कूल (आष्टापूर मळा, लोणी काळभोर, ता. हवेली), श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर ता. पुरंदर- परस्पर स्थलांतर), संकल्प व्हॅली स्कूल (उरवडे ता. मुळशी), एसएनबीपी टेक्नो स्कूल (बावधन ता. मुळशी), राहुल इंटरनॅशनल स्कूल (हिंजवडी ता. मुळशी), अंकुर इंग्लिश स्कूल (जांभे/ सांगावडे ता. मुळशी), श्री साई बालाजी पब्लिक स्कूल (दत्तवाडी नेरे, ता. मुळशी), श्री. मंगेश इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल (अशोकनगर, लिंगाळी रोड, ता. दौंड- परस्पर स्थलांतर), क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल (कासुर्डी ता. दौंड), किडझी स्कूल (शालिमार चौक, दौंड), सुलोचनाताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय (कुंजीरवाडी), तक्षशिला विक्रमशिला इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल(किरकीटवाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *