पुण्यात नवले ब्रीजवर भीषण अपघात

२१ नोव्हेंबर २०२२

पुणे


पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ४८ गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. नर्हे जवळच्या परिसरात अपघात झाला आहे. या घटनेची वर्दी मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आपटत गेल्याची माहिती आहे. या अपघातात एकूण ४८ गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

या अपघातामध्ये अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ५० ते ६० जण जखमी झाले आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यानंतर वित्तहानी आणि जीवितहानीच्या नुकसानीचा नेमका अंदाज मिळू शकेल.

कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकूण ४८ गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *