नाथाभाऊ पाचर्णे युवा मंचातर्फे शिरूरला पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

दि. १०/०१/२०२३
शिरूर
रवींद्र खुडे : विभागीय संपादक


शिरूर : मराठी पत्रकारीतेचे जनक व दर्पण वृत्तपत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारी रोजी असणाऱ्या जयंती निमित्त, मराठी पत्रकार दिन सर्वत्र साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही विविध ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त, पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील संपदा पतसंस्थेच्या सभागृहात, नाथाभाऊ पाचर्णे युवा मंचच्या वतीनेही शिरूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर नाथाभाऊ पाचर्णे यांनी सर्वांचे स्वागत करत प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत होते.

यावेळी शिरूर येथील सर्वच पत्रकार बांधवांचा नाथाभाऊ पाचर्णे व मित्र मंडळाकडून शाल, श्रीफळ, पुष्प व जॉन मॅक्सवेल लिखित “यशस्वी लोक कसा विचार करतात” हे पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक राऊत यांनी पत्रकार बांधवांचे लोकशाहीत व समाजात असलेल्या स्थानाचे महत्त्व विशद केले. पत्रकार प्रवीण गायकवाड व रवींद्र खुडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत अनेक विषयांना हात घातला.

कार्यक्रमासाठी पत्रकार अभिजित आंबेकर, मुकुंद ढोबळे, धर्मा मैड, अनिल सोनवणे, शोभा परदेशी, सतीश केदारी, भगवान श्रीमंदीलकर, भाऊसाहेब खपके, बबन वाघमारे, विजय पवार, तुकाराम खोले, विजय ढमढेरे, भरत घावटे, सुदर्शन दरेकर, महिबूब सय्यद, अनिल बांडे, रवी लेंडे, सागर घोलप, गणेश राक्षे, रवींद्र नागरे सर, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फिरोज सय्यद यांनी केले तर आभार युवराज सोनार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *