हार्दिक पांड्याने घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

३१ डिसेंबर २०२२


भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या याने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने अलीकडेच पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. याआधी हार्दिक पांड्याने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे, ज्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

हार्दिक पांड्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. दोन्हीमध्ये तो आणि त्याचा मोठा भाऊ कुणाल पांड्या अमित शहा यांना भेटताना दिसत आहे. पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आणि आमच्यासाठी मौल्यवान वेळ काढल्याबद्दल मी गृहमंत्री अमित शाहजींचा आभारी आहे. तुम्हाला भेटणे हे एक सौभाग्य आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *