एसटी कामगारांच्या पगार कपातीत गोंधळ, प्रशासनाच्या निर्णयामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता

पिंपरी प्रतिनिधी
१० ऑक्टोबर २०२२


एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ८ आणि ९ जून २०१८ रोजी संप केला. या संपात हजारो कर्मचारी सहभागी झाले. मात्र, आठ जूनलाच राज्य सरकारने ‘ काम नाही तर दाम नाही ‘ असे परिपत्रक काढून एक दिवसाच्या कामबंदसाठी तब्बल आठ दिवसांचे वेतन कपात,असा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे संपातील कामगारांना १६ दिवसांचा पगार कपात करण्याचा निर्णय झाला . ऑगस्टमध्ये अमलात आणला . जे कर्मचारी ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार होते . त्यांच्या पगारातून रक्कम वजा केली मात्र , संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एसटी संघटना न्यायालयात जाऊन त्यांनी या निर्णयावर स्थगिती आणली. आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांचे पगार कपात करू नये म्हणून कामगार संघटना , न्यायालयात गेली. मात्र , महामंडळाने ३१ ऑगस्टला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पैसे कपात केले. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *