ओबीसी व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत

आपला आवाज न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड
२९ जुलै २०२२


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३७ आणि सर्वसाधारण महिलांच्या ३८ जागांसाठी शुक्रवार दि.२९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये माजी नगरसेवक यांच्या हक्काच्या जागेवर महिला आरक्षण पडल्याने त्यांची घोर निराशा झाली यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते नगरसेवक राहूल कलाटे मनसे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या प्रभागात महिला आरक्षण सोडत निघाल्याने महिला राज येणार आहे तर माजी महापौर योगेश बहल यांनाही आपला हक्काचा संत तुकाराम नगर प्रभाग सोडून कासारवाडी या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

माजी महापौर योगेश बहल यांना हक्काचा प्रभाग सोडून कासारवाडी प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची होऊ घातलेली ही निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे.निवडणूकीसाठी एकूण ४६ प्रभाग असणार आहेत.

शिवसेनेचे राहूल कलाटे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या प्रभागात महिला आरक्षण…

खालील प्रमाणे प्रभाग नुसार आरक्षण –

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२२

अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण
प्रभाग प्रभागाचे नाव / अ / ब / क
१ तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला/ खुला
२ चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी / एससी (खुला) / सर्वसाधारण महिला / खुला
३ बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
४ मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
५ चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
६ दिघी-बोपखेल / एसटी / सर्वसाधारण महिला / खुला
७ भोसरी सॅण्डविक कॉलनी-रामनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
८ भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
९ भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला/ खुला
१० इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
११ बालाजीनगर-इंद्रायणीनगर भाग / एससी महिला / ओबीसी / खुला
१२ घरकुल-नेवाळेवस्ती-हरगुडे वस्ती / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
१३ मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
१४ यमुनानगर-त्रिवेणीनगर / एससी / ओबीसी / सर्वसाधारण महिला
१५ संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
१६ नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर / एससी / ओबीसी महिला / खुला
१७ संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर / एससी (खुला) / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला
१८ मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी / एससी महिला / ओबीसी / खुला
१९ चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर / एससी महिला / ओबीसी / सर्वसाधारण महिला
२० काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर / एससी महिला / ओबीसी / सर्वसाधारण महिला
२१ आकुर्डी गावठाण-दत्तवाडी / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
२२ निगडी गावठाण-ओटास्किम / एससी (खुला) / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला
२३ निगडी, वाहतूकनगरी-प्राधिकरण सेक्टर २४ ते २७ / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
२४ रावेत-किवळे-मामुर्डी / एससी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
२५ वाल्हेकरवाडी-शिंदे वस्ती / एससी (खुला) / ओबीसी महिला / खुला
२६ चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
२७ चिंचवडगाव-उद्योगनगर-रामकृष्ण मोरे सभागृह / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
२८ केशवनगर-लक्ष्मीनगर-श्रीधरनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
२९ भाटनगर-मिलिंदनगर-पिंपरी कॅम्प / एससी (खुला) / सर्वसाधारण महिला / खुला
३० पिंपरीगाव-वैभवनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३१ काळेवाडी-विजयनगर-नढेनगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
३२ तापकीरनगर-ज्योतिबानगर-रहाटणी / एससी (खुला) / सर्वसाधारण महिला / खुला
३३ रहाटणी-रामनगर-शिवतिर्थनगर-तापकीरनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३४ थेरगाव-बापुजीबुवानगर-अशोका सोसायटी / एससी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३५ थेरगाव-बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर / एससी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३६ थेरगाव-गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
३७ ताथवडे-पुनावळे-काळा खडक / एससी महिला / ओबीसी / खुला
३८ वाकड-भूमकरवस्ती-कस्पटेवस्ती-वाकडकरवस्ती / एससी (खुला) / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला
३९ पिंपळे निलख-विशालनगर-कावेरीनगर / एससी / (खुला) / ओबीसी महिला / खुला
४० पिंपळे सौदागर-रोझलँड-कुणाल आयकॉन / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
४१ पिंपळे गुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर / एससी महिला / एसटी महिला / खुला
४२ कासारवाडी-फुगेवाडी-कुंदननगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
४३ दापोडी-गणेशनगर-जयभीमनगर / एससी / ओबीसी / खुला
४४ पिंपळे गुरव-काशीदनगर-मोरया पार्क-रामनगर / एससी (खुला) / एसटी / सर्वसाधारण महिला
४५ नवी सांगवी-कीर्तीनगर-कृष्णानगर-औंध हॉस्पिटल / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
४६ जुनी सांगवी-ममतानगर-शितोळेनगर-ढोरेनगर / एससी / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला(ड)
(टीप : प्रभाग १ ते ४५ तीन सदस्यीय व प्रभाग ४६ चार सदस्यीय आहे, त्यामुळे प्रभाग ४६ मधील चौथी जागा खुल्या वर्गासाठी आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *