पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक

दि .३०/१२/२०२२
अहमदाबाद


अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन झाले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी (28 डिसेंबर) अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिराबेन या वर्षी 18 जून 2022 रोजी 100 वर्षांच्या झाल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.या दु:खद घटनेनंतर पंतप्रधान मोदीे आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द न करता नियोजनाप्रमाणे ऒनलाईन पार पाडणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी (27 डिसेंबर) रात्री हिराबेन यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी (29 डिसेंबर) त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे निवेदन रुग्णालयाकडून जारी करण्यात आले होते, मात्र शुक्रवारी (30 डिसेंबर) सकाळी त्यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदी बुधवारी (28 डिसेंबर) दुपारी आईला भेटण्यासाठी दिल्लीहून थेट अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात गेले. तेथे दीड तास आईसोबत राहून तिच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि तिची प्रकृती सुधारल्यानंतर सायंकाळी दिल्लीला परतले. पीएम मोदींची आई हीराबेन अतिशय साधे जीवन जगत होत्या. या वर्षी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये त्यांनी स्वतः जाऊन मतदान केले होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *