बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २ हजार २१७ बालकांना लसीकरण…

बेल्हे दि.३१ (विभागीय संपादक रामदास सांगळे) :- बेल्हे (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २ दोन हजार २१७ बालकांना पोलिओची लस देण्यात आली. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २ हजार २८६ बालकांची नोंद आहे. रविवार (दि.३१) रोजी ० ते ५ वयोगटातील ९८ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले. यासाठी ३२ बूथचे आयोजन करण्यात आले होते. तर लसीकरणासाठी ६९ कर्मचारी कार्यरत होते. बस स्थानक, अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र,अशा महत्वाच्या ठिकाणी लसीकरण करण्यात आले.ऊसतोड मजुरांच्या बालकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाने लसीकरण केले. उर्वरित ३ टक्के बालकांना चा शोध घेऊन पुढच्या दोन ते तीन दिवसात लस दिली जाणार आहे. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी.थोरात यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *