पुण्यातील रिक्षा चालकांचा संप मागे

२९ नोव्हेंबर २०२२

पुणे


पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पुकारण्यात आलेला रिक्षा चालकांचा संप संध्याकाळी मागे घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असून, बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे.

10 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी अॅपवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रिक्षाचालकांनी सोमवारी सायंकाळी संप मागे घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी आंदोलन स्थळी येऊन रिक्षाचालकांची भेट घेतली. त्यावेळी कोलते यांनी आश्वासन दिल्यानंतर रिक्षा चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु 10 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी अॅप बंद झाले नाही, तर रिक्षा चालक पुन्हा आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *