१ जानेवारी रोजी निगडी येथे बुद्धीबळ स्पर्धा

दि .३०/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : शिवभूमी शिक्षणसंस्था आणि पुणे डिस्ट्रीक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेने १ जानेवारी रोजी स्व. शिक्षण महर्षी शिवाजीराव कोंडे स्मृती दिवस जलद बुध्दीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यमुनानगर, निगडी, पुणे येथे शिवभूमी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. पुणे जिल्हा बुध्दिबळ संघटना या स्पर्धेला तांत्रिक मदत करणार आहे. जागतिक बुध्दीबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा होणार आहे.स्पर्धेसाठी ५१ हजार रुपयांची रोख बक्षिसे, १८ चषक, सुमारे ५० पदके खेळाडूंना प्रदान केली जाणार आहेत. ही स्पर्धा ८/१०/१२/१५ या वर्षाखालील गटांमध्ये तसेच खुल्या गटामध्ये घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. राजेंद्र कोंडे, स्पर्धा संचालक,संचालक, शिवभूमी शिक्षण संस्था, मोबा. ९८२२३०३५४० यांच्याशी संपर्क साधावा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *