पिंपरी: रुग्णालयामध्ये कोवीड – १९ संबंधी अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध

बातमी – रोहित खर्गे (विभागीय संपादक),

पिंपरी,१. सप्टेंबर :- अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरूनगर पिंपरी येथे कोवीड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जंम्बो कोवीड सेंटरमध्ये रूग्णांना दाखल करण्यास प्रारंभ झाला असून आज बारा रूग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ,पुणे महानगरपालिका ,पुणे महानगरविकास प्राधिकरण जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने ही जम्बो सुविधा उभारण्यात आली आहे. हे ८१६ खाटांचे स्वतंत्र कोवीड- १९ रुग्णालय असून ६१६ ऑक्सिजन युक्त खाटा व २०० आयसीयू खाटांची सुविधा येथे उपलब्ध आहे. रुग्णालयामध्ये कोवीड – १९ संबंधी अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. ३,९०० चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित केले आहे. रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ ११हजार ८०० चौरस मीटर इतके आहे. २० हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात आले असून या साठी ४ हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. २५ हजार लिटर क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन मेडिकल टॅंक आहेत. रुग्णालयाचे काम ६ ऑगस्ट २०२० रोजी चालू झाले.

येथील आयसीयू महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय उभारण्याचा व ६ महिने चालवण्याचा अंदाजे खर्च ८५ कोटी इतका झाला आहे. अग्निशमन, पेसो (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा )इत्यादी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा खर्च ५० टक्के राज्य शासन व ५० टक्के पुण्यातील स्थानिक शासकीय संस्थांमार्फत करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *