भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला अपघात

३० डिसेंबर २०२२


भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची गाडी डिव्हाडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. अपघातानंतर गाडी जळून खाक झाली आहे.

अपघातात ऋषभ गंभीर जखमी

ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *