शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान, वर्षभरात 400 कोटींचं दान

२९ डिसेंबर २०२२


राज्यातील सर्वाधिक दान जमा होणाऱ्या मंदिरांपैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानला यंदाच्या वर्षीही कोट्यवधी रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. मागील वर्षापेक्षा यंदाच्या दान रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. साईचरणी साई भक्तांनी भरभरून दान दिले आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांनी दिलेल्या दानात सोने, चांदीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

शिर्डीतील साईबाबा चरणी यंदा वर्षभरात 400 कोटींचं दान अर्पण करण्यात आलं आहे. यामध्ये दक्षिणापेटीत 166 कोटी, देणगी काउंटरवर 72 कोटी 26 लाख, डेबिट / क्रेडीट कार्ड द्वारे 41 कोटी, ऑनलाईन देणगीतून 82 कोटी, चेक, डीडी, मनिऑर्डरद्वारे 20 कोटी, सोने 25 किलो 578 ग्राम, चांदी 326 ग्रॅम, या दानाचाही समावेश आहे.

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीचे साईमंदिरास यंदा 1 जानेवारी ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकुण 394 कोटी 28 लाख 36 हजार देणगी मिळाली आहे. 31 डिसेंबरपर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *