२०२० पासून राहुल गांधींकडून ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन

२९ डिसेंबर २०२२


भारत जोडो यात्रेत सुरक्षेचा भंग झाला असून हलगर्जीपणामुळे राहुल गांधींच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य सुरक्षाव्यवस्था पुरवली जावी, अशी मागणी करणारे पत्र पक्षाचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले होते. यावर केंद्रीय राखीव पोलीस दलाने(सीआरपीएफ) उत्तर दिले आहे.

सीआरपीएफने कॉंग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधीनी तीन वर्षात तब्बल 113 वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन केले आहे. राहुल गांधीच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. सीआरपीएफने म्हटले आहे की, राहुल गांधीच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही.फक्त सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीने सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान राहुल गांधी यात्रेत अनेकदा यात्रेत सुरक्षा कवच तोडून लोकांना भेटण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात.

भारत जोडो यात्रेचा पुढील प्रवास पंजाब आणि जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील राज्यांमधून होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राहुल गांधी व अन्य यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *