राजुरीत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१८ ऑगस्ट २०२२

राजुरी


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, द्राक्षपीक उत्पादन व परसबाग या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच त्यानिमित्ताने राजुरी गावचे सुपुत्र विनय आवटे यांचा कृषी सहसंचालक पदी पदोन्नती झाल्याबद्दल गावाच्या वतीने नागरी सत्कार आयोजित केला होता.

सेंद्रिय व शाश्वत शेती बाबत सखोल असे मार्गदर्शन कृषितज्ञ मंगेश भास्कर यांनी केले.शेतकऱ्यांना विविध सेंद्रिय शेतीच्या पद्धती समजावून सांगत असताना आधुनिक युगात शेतीक्षेत्रात टिकत असताना अभ्यासपूर्ण शेती करणे आवश्यक आहे ,भारत हा कृषिप्रधान देश असुन जन्नर तालुक्यात एम.आय.डी.नसल्याने हा तालुका विषमुक्त असुन शेतक-यांणी चांगल्या पद्धतीने टिकाऊ शेती कशी करायची याकडे लक्ष दिले पाहिजे. कुठलेही पिक घेताना माती परीक्षण केले पाहीजेत. शेतातील कचरा शेताच्या एका बाजुला घेऊन त्यावर प्रक्रिया करुन त्यापासुन तयार झालेले सेंद्रिय खत हे पिंकासाठी खुप फायदेशीर आहे असे भास्कर यांनी सांगितले.

 

मानवाची मुख्य गरज ही अन्नधान्य म्हणजे अन्न असून तीचे महत्व कधीही कमी होऊ शकणार अथवा तिला कधीही पर्याय निर्माण होणार नाही. लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने मात्र शेती उत्पादन वाढताना दिसून येत नाही. त्यामुळे पारंपारिक पध्द्तीने शेती न करता आधुनिक पध्द्तीने शेती करून शेती उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात यावा तसेच शेती उत्पादन खर्च कमी केल्यास शेती नक्कीच फायदेशीर आहे.असे मत विनयकुमार आवटे यांनी नागरी सत्काराचे वेळी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित केले हा स्तुत्य उपक्रम असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या करू नये. याचे मार्गदर्शन मिळाले. असे कृषिरत्न अनिल तात्या मेहेर म्हणाले.

 

कार्यक्रमाप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ,भारत सरकारच्या कृषीमुल्य आयोगाचे सदस्य कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, मंगेश भास्कर गावाच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुदाम औटी,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी, माजी सरपंच एम.डी.घंगाळे, एकनाथ शिंदे , बाळासाहेब हाडवळे, अजय कणसे,राजीव औटी,अविनाश औटी,वल्लभ शेळके, सुभाष औटी,शिवाजीराव हाडवळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषी मंडळ अधिकारी राजश्री नरवडे, मुकेश महाजन आदी मान्यवर ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

यावेळी आवटे यांचे गाव राजुरी असल्याने गावातील ग्रामपंचायत, शरदचंद्र पतसंस्था, ज्ञानदिप पतसंस्था,गणेश सहकारी दुध संस्था, विवीध कार्यकारी सोसायटी, हनुमान देवस्थान ट्रस्ट विशाल पतसंस्था जाणता विकास मंडळ, मुसलमान जमात राजुरी या सर्व संस्था च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य जि.के.औटी यांची केले तर प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ यांनी केले व आभार सरपंच प्रिया हाडवळे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *