आगर अमरापूर येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न…

मयुर पाटोळे
बातमी प्रतिनिधी
१५ नोव्हेंबर २०२१

अमरापूर (जुन्नर)


तालुका विधी सेवा प्राधिकरण जुन्नर व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने आगर अमरापूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर पार पडले यावेळी जुन्नर न्यायालयातील वकील कु.ऐश्वर्या जाधव, श्री.राकेश तांबे, श्री.रणजित भगत यांनी ग्रामस्ताना विविध विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. सकपाळ साहेब , न्यायाधीश श्री.घोरपडे साहेब , जुन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री. विकास जाधव साहेब ,आगर च्या सरपंच सौ. नयना तांबे ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सुभाष महाबरे,जुन्नर वकील बार असोसिएशन चे अध्यक्ष सुमित निकम सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी मुख्य न्यायाधीश सकपाळ साहेब यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले यावेळी जुन्नर वकील बार असोसिएशन चे सदस्य हेमंत भास्कर यांनी सूत्रसंचालन केले व श्री. फारूक पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आगर अमरापूर येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *