दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू – बाबा कांबळे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२० सप्टेंबर २०२२

पिंपरी


ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केल्याने जबाबदारी वाढली आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांचे अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. आगामी काळात आणखी मोठा संघर्ष उभा करून या सर्व प्रश्न न्याय द्यायचा आहे. दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू, असे प्रतिपादन ऑटो टॅक्सी, रिक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.

शहरात आल्यानंतर बाबा कांबळे यांनी केले महापुरुषांना अभिवादन

ऑटो टॅक्सी, रिक्षा फेडरेशनची नुकतीच दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद पार पडली. या मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी बाबा कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. पद स्वीकारल्यानंतर बाबा कांबळे मंगळवारी (दि. 20) पिंपरी चिंचवड शहरात आले. या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी, पथारी, हातगाडी संघटना, असंघटित कामगार, कष्टकरी संघटनांच्या प्रतिनिधिकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी एचए येथील छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास बाबा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बाबा कांबळे बोलत होते. लोहा पंचायत समिती उपाध्यक्ष व राष्ट्रीय सदस्यांचे उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, नादेड,यांचाही सत्कार करण्यात आला.

रिक्षा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संघटना प्रतिनिधींनी केले स्वागत

या वेळी लोहा बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध अध्यक्ष शिवशंकर उबाळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळिराम काकडे,घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, मधुरा डांगे, स्वाती शेलार, संगीता लंके ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, उपाध्यक्ष हिरामण गवारे, रवींद्र लंके, अनिल शिरसाट, जाफर भाई शेख ,प्रदीप अय्यर ,सुरज सोनवणे ,शफिक भाई पटेल, किरण एरंडे, अविनाश जोगदंड, निखिल येवले , सोमनाथ शिंदे ,पप्पू गवारे, विलास केमसे ,अविनाश वाडेकर , मनोज काळ डोके, बालाजी गायकवाड , अर्जुन चपटे ,तुषार लोंढे ,सतीश सुरवसे ,विश्वास लोंढे , सुधीर पांचाळ , सचिन स्वामी ,अभिजीत जाधव, गोरक्ष कदम ,मारुती लोंढे , रामा पवार, अशोक शिरसागर, अशोक शिरसागर, रोहिदास पिंगळे ,संतोष गुंड, सुरज सोनवणे उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, ऑटो टॅक्सी, रिक्षाच्या प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या वतीने आंदोलने, मोर्चे, ठिय्या आंदोलन करत आहे. शासन दरबारी विविध मार्गाने पाठपुरावा करत आहे. अनेक प्रश्न तडीस न्हेउन रिक्षा चालकांना न्याय मिळवून दिला आहे. आंदोलनाची दखल राज्यकर्ते घेत आहेत. या कार्याची दखल घेत देशभरातील ऑटो टॅक्सी, रिक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता पहिल्यापेक्षा जास्त जबाबदारी वाढली आहे. स्वागत हार तुरे थांबवुन आता पुढेही जोमाने काम करू असे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले.

रॅली केली रद्द – फटाके फोडण्यात मनाई

राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहरात प्रवेश करताच विविध कष्टकरी प्रतिनिधींनी स्वागत केले. तसेच शहरात रॅलीचे आयोजन केले होते. मात्र रिक्षा चालकांचे, टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जबाबदारी वाढली असून त्यांचे प्रश्न सुटल्यास तोच माझा सन्मान असेल असे प्रतिपादन करत बाबा कांबळे यांनी नियोजित रॅली रद्द केली. व फटाके फोडण्यास कार्यकर्त्यांना मनाई केली, त्यामुळे टॅक्सी, रिक्षा चालक प्रतिनिधींपुढे त्यांनी आदर्श घातला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *