पुणे महापालिकेची प्लॅस्टिक विरोधी कारवाई

दि. २९/१२/२०२२
पुणे


पुणे : पुणे महापालिका आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात फुलमार्केट, मार्केटयार्ड परिसरात विक्रेत्यांवर कारवाई केली. या मध्ये सुमारे चारशे ते पाचशे किलो प्लॅस्टिक जप्त केले. एकंदर ५ केसेस दाखल करण्यात आल्या. तर २५ हजार रुपये दंडाची वसूल संबंधितांकडून वसूल करण्यात आली. वाघोली परिसरात साडेपाचशे ते सहाशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून ४ केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधितांकडून तीस हजार रुपये दंड वसूल केला.

“महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे ( उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पुणे महापालिका सातत्याने करीत आहे. याचा अनुषंगाने बुधवारी करण्यात आलेली ही कारवाई श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईच्या वेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील शशिकांत लोखंडे, अतिरिक्त संचालक, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, विशाल भंडारी, वैज्ञानिक सहाय्यक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील संदीप पाटील, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील इमामुद्दिन इनामदार, प्रमुख आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक राजेश रासकर व उमेश देवकर आदी अधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *