राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट
२९ डिसेंबर २०२२
नागपूर

मुखमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे समाधीचे दर्शन घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या आमदारांनी रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात भेट दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित गुरुवारी सकाळी स्मृती मंदिर परिसरात भेट दिली.
नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप होणार आहे.त्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी आज स्मृती मंदिर परिसरात भेट दिली.या वेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. संघाकडून विकास तेलंग यांनी त्यांचे स्वागत केले. स्मृती मंदिर परिसरात दर्शन घेतल्यानंतर दीक्षाभूमी येथे गेले.