खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

दि. ०६/०१/२०२३
मुंबई


मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईतील शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.या खटल्याची पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीच्या खटला दाखल केला होता. या खटल्यास राऊत हे वारंवार गैरहजर राहत होते. त्यामुळे न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा सोमय्या यांनी हा खटला दाखल केला आहे. शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *