मोटार जळाल्याने देहू नगरपंचायतीच्या हद्दीत पाणी पुरवठा बंद, दुरुस्त करण्यासाठी लागले पाच दिवस

२९ डिसेंबर २०२२

देहूगाव


जल उपसा केंद्रातील मोटार जळाल्याने गेल्या पाच दिवसांपासून देहू नगरपंचायतीच्या हद्दीत पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिक हैराण झाले असून , पाणी विकत घ्यावे लागत असल्याने त्रस्त झाले आहेत. असे चित्र सध्या देहू नगरपंचायत हद्दीत पाहायला मिळत आहे . सोसायट्यांना टँकर विकत घ्यावे लागत आहे . त्यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे . बुधवारी मोटार दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

देहूगाव येथे गेली चार दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाला आहे . याबाबत माहिती घेतली असता येथील कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे सांगण्यात येत होते . याची दुरुस्ती करण्याचे कामही करण्यात आले . यानंतर जल उपसा सुरूही करण्यात आला होता . मात्र ,दोन तासानंतर जल उपसा करणारी मोटार जळाली व पुन्हा जल उपसा बंद झाला . यामुळे पुन्हा दोन दिवस पाणीपुरवठा लांबला . दरम्यानच्या काळात येलवाडी गावातून खासगी पाणी पुरवठादारांकडूनही पाणी पुरवठ्याचा प्रयत्न करण्यात आला . मात्र , पाण्याचे टँकर उपलब्ध नसल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करता आला नाही , असे मुख्याधिकारी डॉ . प्रशांत जाधव यांनी सांगितले . हे जरी खरे असले तरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना पाणी वेळेत मिळावे , हे अपेक्षित आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *