मनसेच्या स्टिंग ऑपरेशनमुळे रेशन दुकानदारांची उडाली भंबेरी

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२० ऑक्टोबर २०२१

ओतूर

जुन्नर तालुक्यात रेशन दूकानांमध्ये तांदूळ, गहू व इतर वस्तूंचे वितरण सुरळीत व व्यवस्थित होत नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांकडून आज ओतूर येथे 2 रेशन दुकानांमध्ये पाहणी करण्यात आली. त्यानुसार मनसे चे पदाधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते तानाजी तांबे, रविराज चाळक, श्रीराम डोके, सलमान मोमीन, आदी मनसे सैनिकांनी ओतूर येथील दोन दुकानामध्ये स्टिंग ऑपरेशन करून निकृष्ट दर्जाचा तांदूळ उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणले यामुळे हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ तात्काळ बंद करावा व सर्वसामान्य लोकांना चांगल्या दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेच्या वतीने आज जुन्नर चे तहसीलदार श्री सबनीस यांना करण्यात आली.

निकृष्ट दर्जाचा तांदूळ तहसीलदारांनी बंद करावा – मनसेची मागणी

या वेळी येथील एक लाभार्थी सूर्यकांत डुंबरे यांनी निकृष्ट दर्जाच्या तांदळा बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. व येथे मिळणारा तांदूळ चांगला दर्जा मिळावा अशी मागणी केली.हा निर्कृष्ट दर्जाचा येणारा तांदूळ बंद करून खाण्यालायक तांदूळ तहसीलदारांनी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मनसे जुन्नर तालुका पदाधिकारी तानाजी तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.दरम्यान मनसेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात येत असून काही दिवसांपूर्वीच कल्याण नगर महामार्गावरील खुबीफाटा ते माळशेज घाटाच्या रस्त्याबाबत आंदोलन करण्यात आले होते. याच पद्धतीने वीज वितरण कार्यालयाच्या विविध प्रश्नांबाबत व गलथान कारभाराबाबत देखील आंदोलन करण्यात आले होते. अशाप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध समस्यांना वाचा फोडण्यात येत असल्यामुळे आगामी काळात मनसेचे राजकीय भवितव्य उज्ज्वल दिसत असल्याचे बोलले जात आहे.

मनसेच्या स्टिंग ऑपरेशनमुळे रेशन दुकानदारांची उडाली भंबेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *