तमाशा क्षेत्रातील कामगिरीबद्दल तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांना मानद “डॉक्टरेट”ही पदवी

तमाशा क्षेत्रातील कामगिरीबद्दल तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांना मानद “डॉक्टरेट”ही पदवी
नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
महात्मा गांधी पेस फाउंडेशन नेपाळ यांच्यावतीने लोकनाट्य तमाशा लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित सावंत नारायणगावकर यांना मानद “डॉक्टरेट” ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली.
पदमश्री गिरीश प्रभूणे, गांधी पेस फाउंडेशनचे अध्यक्ष लाल बहादूर राणा यांच्या हस्ते “डॉक्टरेट” ही पदवी प्रदान करण्यात आली.


मोहित नारायणगावकर यांच्या या कामगिरीबद्दल ज्येष्ठ तमाशा कलावंत तसेच फड मालक मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, संभाजी राजे जाधव, किरण ढवळपुरीकर, मुसाभाई इनामदार, पप्पू मुळे मांजरवाडीकर, रवींद्र महाजन, राजू बागुल, संध्या माने सोलापूरकर तसेच अनेक तमाशा कलावंत व नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, अक्षय वाव्हळ यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *