ऍड.अहमदखान पठाण यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यपदी निवड

नारायणगाव : (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालया अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर राज्याच्या बार कौन्सिल मुस्लिम सदस्य प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर पुणे येथील ऍड.अहमदखान उस्मानखान पठाण यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.


या निवडी संदर्भात दिनांक १० जून २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालयाचे उपसचिव दिनेश सोनवणे यांनी अधिसूचना प्रसिद्ध करून ऍड.अहमदखान पठाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून या विभागाचे मंत्री नवाब मलिक, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


ऍड.अहमद खान पठाण हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या बादशहा तलाव या गावचे मूळ रहिवासी असून यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून कार्य केलेले आहे.
वक्फ विभागाच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव असून सध्या ते महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.विधी व न्याय विभागातील एक तज्ज्ञ व अभ्यासू व्यक्तीची शासनाने वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केल्यामुळे राज्यभर वक्फ कार्यक्षेत्रात काम करनाऱ्या कार्यकर्त्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.