देवेंद्र फडणवीसांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेल मध्ये जातील – नवनीत राणा

२७ डिसेंबर २०२२


नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे राज्यातीलराजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नागपूर येथील अधिवेशनात बरेच बॉम्ब फोडणार आहोत. मी ज्या कोठडीत होतो, त्यात तुम्हालाही टाकणार, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता. यावरून आता खासदार नवनीत राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अडीच वर्षात एकाही प्रकल्पाचं उद्घाट्न केल्याचं उद्धव ठाकरेंना आठवत नसेल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनतेला विकास काम हवी आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी विधानसभा नाही. विधानसभेच्या प्रत्येक मिनीटासाठी महाराष्ट्रातील नागरिक पैसै भरतात. त्यामुळे विधानसभेत जनतेच्या प्रश्नांबद्दल बोललं पाहिजे. कोण कोणता बॉम्ब फोडेल, यात विदर्भातील लोकांना काही रस नाही. अडीच वर्षात काय काम केली, याची दहा नावं सांगावी. पण, काम करताना प्रत्येक व्यक्तीकडून चुक होते. जर, ते बाहेर काढण्यास सुरुवात केली तर, यांना जड जाईल. देवेंद्र फडणवीसांनी लवंगी फोडली तर भारी पडेल. मात्र, देवेंद्र फडणवीसांना फटाके फोडण्यात रस नाही, असे नवनीत राणांनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *