कोंढवळ रस्त्याचे रखडलेले काम पुर्ण करण्याची मागणी…

भिमाशंकर
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकरचे निसर्गाच्या सानिध्यात , दाट धुके, सु सु आवाज करत कानाजवळून जाणारी वाऱ्याची झळूक रंगीबेरंगी पक्षाच्या किलबिलाटाने धुंद झालेला निसर्ग, खारुताई व माकडाची आपल्याच धुंदीत निसर्गाशी सुरु असणारे  हितगूज जणू येथे येणाऱ्या निसर्गप्रेमीचे स्वागत करत असते. येथील प्रमुख आकर्षण असणारा धबधबा पाहण्यासाठी खास आकर्षण असते पण येथे सुरक्षा गरजेची आहे.  व निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याची आनोख्या उधळणीचे दर्शनघडविणाऱ्या येथील कोंढवळ ते ढगेवाडी ( ता. आंबेगाव ) या रस्ताचे काम काही प्रमाणात झाले असून उर्वरित काम बंद आहे. ते लवकर पुर्ण करावे, अशी मागणी कोंढवळ ग्रामस्थांनी केली आहे.

Advertise

एकीकडे निगडाळे गावाहून कोंढवळ फाट्यावरून कोंढवळ गावात जाणारा रस्ता वनविभागातून जात असून वनविभागाने या रस्त्याला परवानगी दिली आणि रस्ताही तयार झाला आहे. परंतु एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने ढगेवाडी ते कोंढवळ रस्ता हा मंजूर करून देखील काही आडमुठ्या धोरणामुळे हा रस्ता प्रलंबीत राहिला असल्याचे गावकरी सांगतात. हा रस्ता सुरू झाल्यास ६ ते ७ किलोमीटरचे अंतर कमी होऊन कोंढवळ येथील नागरिकांना प्रवासासाठी हा रस्ता सोईचा होणार आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कोंढवळ गावचे ग्रामस्थ सागर कोकाटे,यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *