जुन्नर नगर परिषद राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी फिरोज पठाण यांची नियुक्ती

जुन्नर (पवन गाडेकर)
जुन्नर नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व पक्षप्रतोद पदी ज्येष्ठ नगरसेवक फिरोज मेहबूब खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नगरपरिषदेतील राष्ट्रवादी चे गटनेते दिनेश दुबे यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या पदावर फिरोज पठाण यांची गटनेता व पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे पठाण हे २००६ मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

२००९ मध्ये उपनगराध्यक्ष म्हणून पक्षाच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली होती २०११ ते २०१६ या कालावधीत स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्षाने संधी दिली २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हावर ते जनतेमधून नगरसेवक म्हणून निवडून आले.

माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. याशिवाय हिंदू-मुस्लीम ऐक्य राखण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *