विनाकारण ११२ ला कॉल केला पोलीस गाडीत जेलला गेला

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
८ फेब्रुवारी २०२२

यवत


यवत(ता.दौंड) येथील पोलीस स्टेशनं च्या हद्दीत दि.४रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील तलाठी कार्यालया जवळ राहणारे अशोक दिगंबर गायकवाड राहणार यवत तालुका दौंड जिल्हा पुणे हा विना कारण आणि वारंवार महाराष्ट्र पोलिसांच्या मदती साठी देण्यात आलेल्या ११२ या नंबर वर संपर्क करून पोलिसांचा वेळ वाया घालवत होता.याच वेळी पोलीस स्टेशनं मध्ये संपर्क ११२ या कामावर असलेले पोलीस अंमलदार संतोष बबन गायकवाड व होम टेळे हे असताना गायकवाड हा वारंवार त्रास देत असल्याने त्यांनी समक्ष घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता तो मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत दिवसल्याने त्याला वैद्यकीय तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.

वैद्यकीय अहवाला त तो मद्य प्राशन केल्याचे आढळून आल्याने त्याच्या वर यवत पोलीस स्टेशनं ला विविध कालमांनुसार गुन्हा दाखल केला असल्याने विनाकारण त्याने ११२वर संपर्क करणे चांगलेच महागात पडले आहे. दौंड न्यायालयात आरोपी अशोक गायकवाड याला हजर केले असता त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आल्ली असल्याची माहिती मिळाली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *