२३ डिसेंबर २०२२
नागपूर
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर इथं सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं स्वागत केलं. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.विधिमंडळातील कामकाजासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असं मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करत सांगितले आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.