बीकेसीतल्या मेळाव्यावर खर्च कुणाच्या खात्यातून झाला? यावर किरीट सोमय्या का बोलत नाहीयेत? – सुषमा अंधारे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ नोव्हेंबर २०२२


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारेंनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं.  शिवसेनेची ऊर्जा वाढली आहे. ताकद वाढली आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय की ही अटक बेकायदेशीर होती. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे कारवाया करण्याची ईडीची पद्धत आहे. ईडीचा रेट ऑफ कन्व्हिक्शन अर्ध्या टक्क्यानेही कमी आहे. त्यामुळे ईडीची खरंच गरज आहे का? यावर सभागृहांमधून प्रश्न विचारण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या.

मला एक कळत नाही की जे लोक संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नातला मेहंदीवाल्याचा, गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ते लोक बीकेसी मेळाव्यात करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोर कधी देणार? मी किरीट सोमय्यांना वारंवार सांगते की मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे. मी तुमच्यावर आरोप करत नाही, टीका करत नाही, काहीच वाईट बोलत नाही. उलट मी त्यांचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे. पण किरीटभाऊ, अनिल परबांचं रिसॉर्ट फार लांबचा पल्ला आहे. त्याआधी मुंबईत नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? तुम्ही इतरांना जेव्हा हिशोब विचारता, तेव्हा भाजपातल्या आणि मित्र पक्षांतल्या लोकांना हिशोब कधी विचारणार?” असा सवाल त्यांनी किरीट सोमय्यांना केला. मला एक कळत नाहीये की नोंदणीच न झालेल्या पक्षाच्या बीकेसीतल्या मेळाव्यावर खर्च कुणाच्या खात्यातून झाला? यावर किरीट सोमय्या का बोलत नाहीयेत?” असाही सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *