वीजबिल तक्रार निवारण आपल्या दारी मोहननगर येथे उपक्रम

बातमीदार: रोहित खर्गे (विभागीय संपादक)

पिंपरी चिंचवड : दि ११ ऑक्टोबर
मोहननगर प्रभाग क्रमांक 24 येथे अनेक दिवसांपासून नागरिकांना वीज बिला संदर्भात अडचणी भेडसावत होत्या व नागरिकांना पायपीट करत थरमॅक्स चौक येथे जावा लागत असे,व रांगेत उभे राहून बराच वेळ थांबावे लागत असे. या संदर्भात नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला.

नागरिकांना त्रास होऊ नये वीज बिल संदर्भात तक्रार निवारण व्हावी या उद्देशाने तक्रार निवारण आपल्या दारी हा उपक्रम मोहन नगर येथील शिव पार्वती सभा मंडप (महादेव मंदिर) या ठिकाणी सामजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे यांच्या प्रयत्नाने व महावितरण कंपनीचे अतिरिक्त अधीक्षक अभियंता अधिकारी उमेश कवडे, कनिष्ठ अभियंत्या कृत्तिका भोसले, सहाय्यक लेखापाल श्री परब यांच्या साहायाने हा उपक्रम राबविण्यात आला.

तक्रार निवारण आपल्या दारी या उपक्रमात नागरिकांच्या वीज बिल दुरुस्ती, नादुरुस्त मीटर बदलणे, बिलाचे हफ्ते करणे, बिला संदर्भात गैरसमज दूर करणे इत्यादी कामे मार्गी लागले. आणि या उपक्रमामुळे नागरिकांना खूपच मदत झाली अशी माहिती सामजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे यांनी दिली.