चिखली येथे भर रस्त्यात आढळला अजगर

पिंपरी : शहरातील चिखली परिसरात रहदारीच्या रस्त्यावर आलेल्या एका अजगराची सुटका पुण्यातील स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशनच्या कार्यकर्त्यानी केली.

हा अजगर ३ ते ५ महिने वयाचा, इंडियन रॉक पायथॉन जातीचा होता. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी त्याला पाहिल्यावर त्यांनी स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशनचे सदस्य ओंकार देशमाने यांना कळविले. त्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ तेथे धाव घेऊन अजगराला सुरक्षितस्थळी हलविले. वाढत्या शहरीकरणामुळे वन्यप्राणी शहरात आढळून येत आहेत. नागरिकांनी अशा घटनेसए खबर तात्काळ 1926 ह्या क्रमांकावर संपर्क करून घटनेची माहिती वनविभागाला द्यावी किंवा 7276882656 ह्या क्रमांकावर संपर्क करून आम्हाला द्यावी असे आवाहन स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *