आकुर्डी येथे जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांगला प्रतिसाद

पिंपरी : निगडीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा शनिवार, १७ डिसेंबर रोजी कृष्णा सहकारी गृह रचना हाउसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये पार पडला.

या मेळाव्यात परीसरातील शरद हाउसिंग सोसायटी, स्नेह सदन हाउसिंग सोसायटी, रस्टन हाऊसिंग सोसायटी, जयंती हाउसिंग सोसायटी, इंडियन कार्ड हाउसिंग आणि इतर काही हाऊसिंग सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला. सुमारे शंभर ते दीडशे ज्येष्ठ नागरिकांनी मेळाव्यामध्ये भाग घेतला.पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्फे ज्येष्ठ नागरिक विभागाचे प्रमुख पोलीस अधिकारी राजाराम शेळके व राजेंद्र होनराव यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निराकरणासाठी तसेच आनंददायी, सुरक्षित आणि निश्चिंत आयुष्य जगण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थितांना महत्त्वाची माहिती, फोन नंबर व पत्ते दिले गरज पडल्यास ज्येष्ठ नागरिक तेथे संपर्क साधू शकतात.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, परिसरातील जे नागरिक अलिप्त राहतात किंवा ज्यांना मदतीची गरज आहे अशा ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून पोलीस कक्षाकडे देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची प्रास्ताविक कृष्णा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव फडतरे यांनी केले. कृष्णा सहकारी सोसायटीचे सचिव अनिल चव्हाण आणि सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रा. भूषण ओझर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *