राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

२२ डिसेंबर २०२२


सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला AU नावाने ४४ वेळा फोन कॉल करण्यात आले होते. AU हा विषय अतिशय गंभीर आहे. AU चा अर्थ अनन्या उद्धव असा नाही, AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, हे बिहार पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याची माहिती लोकांना मिळायला हवी, असेही राहुल शेवाळे म्हणाले.

राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर गेलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यातच यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे. AU नावाची माहिती घेतो. त्या केसच्या संदर्भात महाराष्ट्रातील लोकांच्या मनात संभ्रम होता, आजही आहे. नक्की त्याची माहिती घेऊन बोलतो अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *