बेल्ह्यातला ‘तो’ धोकादायक खड्डा बुजवला

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
३० जुलै २०२२

बेल्हे


बेल्हे (ता.जुन्नर) बायपास ते बसस्थानक रोडवरील शरद बँकेजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा धोकादायक बनत असल्याची बातमी आपला आवाजने (दि.२४) रोजी प्रसिद्ध केली होती.सदर बातमीची ग्रामपंचायतीने दखल घेऊन हा खड्डा मुरूम टाकून बुजवला आहे.

“आपला आवाज”च्या बातमीची ग्रामपंचायतीने घेतली दखल

याठिकाणी मोठा खड्डा पडला होता त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा खड्डा अधिकच मोठा व खोल झाला होता. वाहनाला येण्या-जाण्यासाठी अडथळा होत होता. वाहन चालकांना मोठी कसरत करून वाहने चालवावे लागत होते. खड्डा बुजवल्याने वाहन चालकांनी ग्रामपंचायतीने आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *