हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानच पडेल – संजय राऊत

२२ डिसेंबर २०२२


नागपूरच्या अधिवेशनात सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत, त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरु आहे. त्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी आरोप सुरु आहेत. हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडेल असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले की, हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानच पडेल असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आमच्यावर कितीही आरोप करा, माणसं फोडो, माणसं फोडा शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाही. मागे हटणार नाही. जे हा खेळ करतायेत त्यांचं राज्य औटघटकेच आहे. असे संजय राऊत म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याच होती हे सीबीआयने सांगितले आहे. तरीही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. बिहार पोलिस त्यांच्या राज्यात. सुशांतसिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंना सीबीआयने क्लिनचीट दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का? असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला. नागपूरच्या अधिवेशनात सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत, त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरु आहे. त्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी आरोप सुरु आहेत. ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंतचे आरोप आहेत, अशा व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर आरोप करणं म्हणजे फुटीर लोक किती खालच्या स्तरावर गेलेत हे दिसून येत आहे. असे राऊत म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *