पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक शगेला…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी: दि २८ मार्च २०२१
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक वाढला असून रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच २००० पार झाला असून आज नवीन कोरोना रुग्णांची संख्या २२७५ इतकी झाली आहे. तर आज कोरोना मुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त राजेश पाटील यांनी कडक निर्बंधांचे आदेश काढले असून त्याचे नागरिक पालन करताना दिसत नाहीत. आजही बरेच नागरिकांची विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसले तर उद्या धुळवड असल्याने मद्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. होळी उत्सवासाठीही नागरिक रस्त्यावर आले होते .

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना कहर व उद्रेक पाहता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत आज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत जमाव बंदी चे आदेश दिले आहेत नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मास्क चा वापर करावा असे आवाहन वारंवार केले जात आहे पण नागरिक त्याला दाद देत नासल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. नागरिकांनी जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर याच नागरिकांना येणाऱ्या काळात व्हेंटेलेटर बेडही नशिबी येणार नाही. अजूनही वेळ गेलेली नसून नागरिकांनी कोरोनाचे सगळ्या नियमांचे पालन करावे असे आयुक्त व महापौर वारंवार सांगतात त्याकडे गांभीर्याने पहावे.